कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाची कमाल एकाच दिवशी दोन कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार!
उरण -
कामगार नेते महेंद्रशेठ घरत हे राजकिय, सामाजिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहेत परंतू कामगार क्षेत्रात त्यांची वेगळीच छाप आहे. दरवर्षी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून १५ ते २० पगारवाढीचे करार केले जातात. दिनांक २१ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी मे. बकुळ एरोमॅटीक्स पाताळगंगा व CWC इम्पेक्सपार्क द्रोणगिरी या दोन कंपन्यांतील कामगारांसाठी पगारवाढीचे करार करण्यात आले. मे. बकुळ एरोमॅटीक्स पाताळगंगा येथिल कामगारांसाठी ९००० रुपये पगारवाढ तसेच दरवर्षी १५०० रुपये बोनसमधे वाढ व इतर सोयी - सुविधा देण्याचे मान्यकरण्यात आले आहे. तर द्रोणगिरी येथील मे. MSA ग्लोबल लॉजिस्टिक्स या कंपनीतील मे. निधी इंटरप्रायाजेस या कंत्राटाअंतर्गत काम करणाऱ्या सर्व्हेअर कामगारांना ४५०० रुपये पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारनाम्याप्रसंगी न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष पी. के. रमण,सरचिटणीस वैभव पाटील, बकुळ व्यवस्थापनातर्फे सिनियर जनरल मॅनेजर सि. एस. उपाध्याय, फॅक्टरी मॅनेजर दिलीप पै, ॲडमिन मॅनेजर आर. एच. गायकवाड तर कामगार प्रतिनिधी चेतन खाने, अक्षय म्हात्रे ,प्रसाद खाने उपस्थित होते. तसेच MSA ग्लोबल लॉजिस्टिक्सचे ॲडमिन उपेंद्र म्हात्रे, निधी इंटरप्रायाजेस चे डायरेक्टर प्रेमनाथ ठाकूर, कामगार प्रतिनिधी राजेश ठाकूर , तुकाराम ठाकूर, मारुती पाटील, आकाश घरत, सुमित ठाकूर , संदीप ठाकूर, संतोष पाटील आदी उपस्थित होते. दोन्ही कंपन्यांतील कामगारांनी संघटना पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
Popular posts
वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णसेवा देणाऱ्या कर्तृत्ववान डॉक्टर महिलांचा केला सत्कार
इमेज
गोवा मुक्ती संग्रामातील हुतात्मा हिरवे गुरुजी यांची १०४ वी जयंती साजरी
इमेज
*जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इमेज
डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कोकण विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला
इमेज